आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सतीश भाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली- संतोष वळसे पाटील.

489

शिरूर तालुक्यातील पत्रकार सतीश भाकरे यांचे निधन झाले निधनामुळे जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनाही घटना मनाला लागली आहे, आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सतीश भाकरे यांना संघाचे संस्थापक डि.के. वळसे-पाटील, विलास शेटे,सुदाम बिडकर,निलेश कान्नव व सर्व पत्रकार संघाच्या सभासदांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना संतोष वळसे-पाटील म्हणाले पत्रकार आणि सर्वांना चुटपूट लावणारी गोष्ट म्हणजे टाकळी हाजी तालुका शिरूर येथील दैनिक पुढारीचे बातमीदार सतीश भाकरे यांचे दुर्दैवी झालेले निधन . सतीश आणि माझा जवळपास दहा वर्षापासून संपर्क . टाकळी हाजी डेट लाईन मिळावी म्हणून त्यावेळी त्यांनी मला फोन केलेला चांगला आठवतो, दैनिक पुढारी चे सहयोगी संपादक सुहास जगताप साहेब यांच्याशी बोलणे झाले आणि त्यांनी टाकळीहाजी येथून सतीश ने बातमीदारी सुरू करावी यासाठी सांगितले . त्यानंतर सतीश भाकरे यांनी सचोटीने बातमीदारी करत बेट भागात तसेच आंबेगाव शिरूर तालुक्यातील हद्दीवरील गावांच्या निर्भीड बातम्या देऊन आपली बातमीदारी जागृत ठेवली. कमी बोलणं आणि कामात राम शोधणारे पत्रकार आहेत, त्यामध्ये सतीश चा अग्रक्रम नेहमीच एक नंबर राहिला. विधानसभा निवडणुकीत बातम्या करण्यासाठी सतीश भाकरे, मधु गायकवाड ,किशोर खुडे मंचर येथे असायचे, त्यांनी बातम्या केल्यानंतर त्या बातम्या मी पाहून पुढे वृत्तसंस्था ना फॉरवर्ड करायचा , त्या माध्यमातून सतीशची बातमीदारी जवळून अनुभवायला मिळाली .भीमाशंकर साखर कारखाना आणि त्यापाठोपाठ पराग सहकारी साखर कारखान्यात काम करत असताना शेतकऱ्यांच्या आणि कारखानाचा समन्वय ठेवण्याचे काम सतीश ने मोठ्या मेहनतीने पार पाडले.टाकळीहाजी परिसरात झालेले अपघात किंवा सर्पदंशाच्या झालेल्या घटनांमधील रुग्णांना वैद्यकीय उपचार तातडीने मिळावी यासाठी सतीश नेहमीच मला फोन करायचा, साधारण सात-आठ महिन्यांपूर्वी सर्पदंश झालेली महिला मंचर उपजिल्हा रुग्णालयात येत आहे ,तेथील डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी सांगावे म्हणून त्याने मला फोन केला. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या महिलेला जीवदान मिळाले , त्यावेळेस आभार व्यक्त करण्यासाठी सतीश आणि त्यांचे सहकारी मला मंचर येथे भेटण्यासाठी आले .त्यावेळी मी नम्रपणे सांगितले की उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे, म्हणून त्यांचे आभार माना असे म्हणून मी सतीश उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी गेलो. त्यावेळी अतिशय नम्रपणे सर्वांचे आभार मानून अशीच वैद्यकीय सेवा असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंचर उपजिल्हा रुग्णालय असे त्याने आवर्जून सांगितले . अशाप्रकारे सतीश च्या

असंख्य आठवणी माझ्या मनात आहे. हृदय विकारा सारखे आजार ताणतणाव यामुळे जडतात असे डॉक्टर नेहमी सांगतात. त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावा. बातमीदारांनी आपण वैद्यकीय दृष्ट्याफिटनेस आहे किंवा नाही यासाठी किमान तीन ते सहा महिन्यातून आपण आणि आपल्या कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी केली पाहिजे. कामाच्या दगदगीत अति ताण यामुळे हृदयविकार यासारखे झटके येतात याला अति तान म्हटले तरी वावगे होणार नाही, त्यासाठी प्रत्येकाने तणावमुक्त जीवन जगून बातमीदारी केली पाहिजे. सतीश चा मित्र परिवार साखर कारखाना, पत्रकार बांधव आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.सोमवारी सकाळी ठीक पावणे आठ वाजता पुढारीचे सहयोगी संपादक सुहास जगताप साहेब यांचा फोन आला, अरे सतीश भाकरे यांचे निधन झाल्याचे समजते , असे ऐकताच माझ्या अंगावर शहारे आले. त्यानंतर मी खात्री करण्यासाठी शिरूर तालुकापत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते , शहाजी पवार, वरिष्ठ पत्रकार शरद पाबळे यांना फोन करून खात्री करून घेतली . सतीशच्या निधनाची बातमी जगताप साहेब यांना सांगताच त्यांनी ही हळहळ व्यक्त केली .सतीशच्या दुर्दैवी जाण्याने सर्वांना चुटपुट लागून राहिली आहे. दैनिक पुढारी वृत्त संस्थेतील खंदा समर्थक आपल्यातून निघून गेला ही बाब सर्वांना चुटपुट करणारी ठरली आहे. सतीश या दिलदार मित्राला आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. संतोष वळसे पाटील मंचर.