नरसिंह क्रिडा मंडळाचे खो-खोत सलग सहावे विजेतेपद..

363

रांजणी(ता.आंबेगाव)येथील नरसिंह क्रिडा मंडळाच्या महीला संघाने पिंपरी-चिंचवड संघाचा पराभव करत जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे नरसिंह क्रिडा मंडळाने सलग सहावे विजेतेपद पटकावत विजयाची परंपरा कायम ठेवली.
पुणे जिल्हा खो खो असोसिएशन व नवमहाराष्ट्र संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी खो खो स्पर्धा (पुरुष -महिला ) 2021 नुकत्याच स. प. महाविद्यालय पुणे येथे पार पडल्या.या स्पर्धेत रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळाचाही सहभाग होता,स्पर्धेत नरसिंह क्रिडा मंडळाच्या महिला संघाने अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ संघ पिंपरी चिंचवड संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकावले. नरसिंह क्रीडा मंडळाने महिला गटात मिळवलेले हे सलग सहावे विजेतेपद असल्याची माहीती नरसिंह क्रिडा मंडळाचे प्रशिक्षक संदीप चव्हाण यांनी दिली.
नरसिंह क्रिडा मंडळाच्या संघातील खेळाडू पुढील प्रमाणे-काजल भोर -खेडेकर,स्नेहल जाधव,भाग्यश्री जाधव,दिव्या जाधव,श्वेता वाघ, ऋतुजा भोर,प्रिया भोर,स्नेहा भोर,प्रांजल जाधव,वैष्णवी वाघ,पूर्वा वाघ,निलम वाघ विजयी संघातील खेळाडूंना प्रशिक्षक संदीप चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. मिळालेल्या यशाबद्दल महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले,पुणे जिल्हा खो खो असोसिएशन चे सचिव शिरीन गोडबोले यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.