मोफत शालेय गणवेश वाटप योजना,दीड लाख विदयार्थ्यांसाठी 5लाख अनुदान…….

147

सिताराम काळे

पुणे जिल्हा परिषदेने याबाबत ऐतिहासिक निर्णय घेत पुणे जिल्हा परिषदेंच्या शाळांत शिकणा-या सर्वच संवर्गातील विदयार्थ्यांसाठी मोफत गणवेशासाठी आर्थिक तरतुद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्यातील इतर जिल्हयांनी देखिल पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श घेवून ही योजना राबवावी, अशी मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज यांनी केली.

पुणे जिल्हा परीषद समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाने जिल्हा परीषद शाळांतील विदयार्थ्यांसाठी सन २०१८-१९ च्या युडायस नुसार मंजुर १ लाख ५९ हजार ३९१ लाभार्थ्यांसाठी प्रति विदयार्थी एका गणवेशासाठी याप्रमाणे तिनशे रूपये याप्रमाणे ४ कोटी ७८ लाख १७ हजार ३०० रूपये अनुदान तालुकास्तरावर वर्ग करण्यात आले आहे. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षकांचे शिक्षण या केंद्र पुरस्कृत योजनांचे एकत्रीकरण करून समग्र शिक्षा अभियान ही नवीन योजना सन २०१८-१९ पासुन सुरू करण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परीषदेच्या सर्व शाळांत इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसुचित जाती व जमातीची मुले, दारिद्रयरेषेखाली पालकांची मुले यांना मोफत शालेय गणवेश वाटप योजनेचा लाभ दिला जातो.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणाचे उद्दीष्ट साध्य करणे, मागासवर्गीय मुलांचे गळतीचे प्रमाण कमी करणे हा यामागील उद्देश आहे.

जिल्हा परीषद शाळेत गोर-गरीबांची वडयावस्तांवरील मुले येत असतात. शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत इ.१ ली ते ८ वीच्या विदयार्थ्यांना मोफत गणवेशासाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. मात्र सर्व विदयार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठयपुस्तके दिली जातात. त्याप्रमाणे मोफत गणवेशासाठी सुध्दा सर्व समाजातील मुलांसाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. इतर समाजातील मुलांना या गणवेश योजनेचा लाभ दिल्यास आर्थिक स्थिती अभावी शिक्षणापासून वंचित असलेल्यांना लाभ दिल्यास शिक्षणाच्या सार्वत्रिककीरणाचा उद्देश साध्य होईल, याबाबत पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज गेली तीन वर्षे शासनस्तरवर निवेदने देवून पाठपुरावा करत आहे.

आंबेगाव न्यूज व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील व्हाट्सअप चिन्हावर क्लिक करा.