घोडेगाव पोलीसांच्या रात्र गस्त पथकाचा वाळू माफियांना दणका ..

714

 

सिताराम काळे

 घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडनदीच्या पात्रात अवैध रित्या वाळचु उत्खनन करत असताना पोलीस ठाण्याच्या रात्र गस्त पथकाने कारवाई करत पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी कीए चास गावचे हद्दीत नारोडीकडे जाणारे पुलाचे शेजारी स्मशान भुमीजवळ दि. २७ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वैभव बबन कडुसकर (वय.42) रा. साकोरे, पवन सुधीर थोरात राण् मंचर, तुषार शांताराम टेके रा. वडगाव काशींबेग, जयेश माने रा. चास व सुमंत चिखले रा. विठ्ठलवाडी.नांदुर हे पाच व्यक्ति घोडनदीच्या पात्रात गौणखनिज वाळुचे उत्खनन करून सार्वजनिक मालत्तेचे नुकसान करत असताना घोडेगाव पोलीस ठाण्याच्या रात्र गस्त पथकाला दिसले त्यांनी लगेच कारवाई करत संबंधित व्यक्तिंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करता असताना तुषार टेके, जयेश माने व सुमंत चिखले हे तिन व्यक्ति रात्री अंधाराचा फायदा घेवुन त्या ठिकाणाहून पळून गेले.वैभव कडूसकर व पवन थोरात या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई शरद कुलवडे यांनी पोलिस ठाण्यात दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहू शिंगाडे, पोलीस हवालदार मनिषा तुरे करत आहे.