अवसरी बुद्रुक येथे सख्या बहीण-भावाचा कोरोनाने मृत्यू,हिंगे पाटील परिवारावर दुःखाचे सावट..

10865

अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव येथील कु.माधवी बाळासाहेब हिंगे पाटील (वय 31) हिचे अकरा दिवसापूर्वी कोरोनाने निधन झाले असतानाच तिचा भाऊ मयूर बाळासाहेब हिंगे पाटील (वय 29) याचे आज शनिवारी पुणे येथे कोरोणाने निधन झाले बहिण-भावाचा कोरोना ने मृत्यू झाल्याने हिंगे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
माधवी हिंगे पाटील यांचे शिक्षण ded झाले असून तिने ज्योतिषशास्त्र, अंक शास्त्राची पदवी घेतली आहे तर मयूर हा संगणक इंजिनीयर आहे पंधरा दिवसापूर्वी आई-वडील, भाऊ-बहीण एकाच वेळी पॉझिटिव्ह आले, आई-वडील व्यवस्थित कोरोनातून बरे झाले, माधवी व मयूर यांना कोरोना चा प्रादुर्भाव जास्त असल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार चालू असतानाच माधवी हीचे निधन झाले, माधवी हीचा शुक्रवारी दहावा होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मयूर यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, माधवी व मयूर यांचे वडील शेती करत असून आई पंचायत समिती आंबेगाव येथे अंगणवाडी केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहे.