आंबेगाव तालुका क्रीडा संकुल मंचर साठी संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन- राहुल पडवळ यांची माहिती…..

181

गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून आंबेगाव तालुका क्रीडा संकुल मंचर याठिकाणी एकाहत्तर लक्ष रुपये किमतीच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आज शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते करण्यात आला. संकुलातील अद्ययावत व्यायाम शाळेतील सात लक्ष रुपये किमतीचे नवीन व्यायाम साहित्य व नऊ लक्ष रुपये किमतीच्या कबड्डी च्या दोन मॅटस चे सेट या सर्व क्रीडा साहित्यांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
आंबेगाव तालुका क्रीडा संकुल मंचर या ठिकाणच्या आरोग्य सुविधांचा वापर तालुक्यातील अनेक नागरिक करत आहेत यावेळी सुरक्षिततेसाठी ही संरक्षक भिंत बांधली जाणे अत्यंत महत्त्वाची बाब होती. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर वळसे पाटील  यांनी त्वरित निधी उपलब्ध करून आज या भिंतीचे काम सुरु झाले.
यावेळी प्रांताधिकारी सारंग कोडीलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पंचायत समिती उपसभापती संतोष भोर, क्रीडा संकुल समिती सदस्य ॲड. राहुल पडवळ, मंचर ग्रामपंचायत सदस्य कबड्डी खेळाडू लक्ष्मण थोरात भक्ते पाटील, क्रीडा संकुल व्यवस्थापक समीर ढेरंगे,जिल्हा क्रीडा अधिकारी रमेश बागुल, तालुका क्रीडा अधिकारी आत्मसिद्ध सोनलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा संकुल परिसरात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या संरक्षक भिंतीचा उपयोग होणार असून अत्याधुनिक व्यायाम साहित्य व कबड्डीचे मॅट चे सेट यांचा उपयोग तालुक्यातील आरोग्य प्रेमी नागरिक व होतकरू खेळाडूंना होणार आहे.