नर्मदे हर परिवार व पंचतारा मित्र मंडळ घोडेगाव यांनी लोकसहभागातून तयार केलेल्या स्वर्ग रथाचे केले लोकार्पण..

266

सिताराम काळे

– भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत नर्मदे हर परिवार व पंचतारा मित्र मंडळ घोडेगाव यांनी लोकसहभागातून सामाजिक बांधिलकी जपत अदयावत स्वर्ग रथाचे (वैकुंठ रथ ) लोकार्पण ह.भ.प. केशवानंद महाराज, ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले, कैलासबुवा काळे, जयसिंगराव काळे यांचे हस्ते करण्यात आले.

घोडेगावमध्ये अंतयात्रा काढण्यासाठी स्वर्गरथाची सूविधा नव्हती. परिणामी खांदयावर तिरडी घेऊन स्मशानभूमी पर्यंत अंतयात्रा काढावी लागत असे किंवा इतर गावांमधून स्वर्गरथ आणावा लागत होता. जनतेच्या सोयीसाठी स्वर्गरथ घोडेगाव मध्ये असावा यासाठी नर्मदे हर परिवाराचे विनोद काळे, पंचतारा मित्र मंडळाचे धनंजय काळे यांनी लोकसभागातुन स्वर्गरथ तयार केला. अन् तो रथ ग्रामपंचायत घोडेगाव यांच्या ताब्यात दिला. त्याचा लोकार्पण सोहळा दि. १५ ऑगस्ट रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. स्वर्गरथसाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे यावेळी आभार व गुलाबपुश्प देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी सभापती कैलासबुवा काळे, जयसिंगराव काळे, सुरेशशेठ काळे, शामशेठ होनराव, अॅड. संजय आर्विकर, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे, दशरथ काळे, तुकाराम काळे, कपिल काळे, शंकर गाडेकर, नरेंद्र काळे, नितिन काळे, प्रशांत काळे, राजेश काळे, सतिश जाधव, रूपाली झोडगे, गजानन काळे, अतुल गडकरी, बि. डी. काळे महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव, नर्मदे हर परिवार व पंचतारा मित्र मंडळाचे कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.