आंबेगावच्या सुपुत्राने गिरिप्रेमी संस्थेच्या साहाय्याने माऊंट मंदा 1 हे शिखर यशस्वीपणे सर केले…

697

आंबेगाव तालुक्याचा सुपुत्र डॉ.सुमित सुरेश मांदळे यांनी गिरिप्रेमी संस्थेच्या शिलेदारांच्या साहाय्याने माऊंट मंदा-1 हे शिखर सर करून भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला आहे.
या मोहिमेत डॉक्टर सुमित मांदळे, विवेक शिवदे, पवन हडोळे यांनी शिखर माथा गाठून नवा अध्याय रचला आहे, या मोहिमेत सर्वात तरुण सदस्य म्हणून निकुंज शहा याने सपोर्ट मेंबर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.एवरेस्ट वीर आनंद माळी व ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते हिमालय पर्वत रांगेत केदार गंगा व्हॅलीत माऊंट मंदा हा तीन शिखरांचा समूह आहे यापैकी माऊंट मंदा 1 या शिखराची उंची 6510 मीटर आहे चढाईसाठी अत्यंत आव्हानात्मक असलेल्या या शिखरावर गिरिप्रेमी च्या गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली.
या शिखरावर आत्तापर्यंत अनेक गिर्यारोहकांचा चढण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. 18 सप्टेंबर सकाळी गिरिप्रेमी च्या गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई करून माऊंट मंदा 1 सर केले आहे.
अवसरी बुद्रुक या आंबेगाव तालुक्यातील डॉक्टर सुमित मांदळे हा रहिवासी असून आत्तापर्यंत गिर्यारोहणाच्या अनेक यशस्वी मोहिमा त्याने सर केले आहेत. सुमित मांदळे यांनी आत्तापर्यंत गिरीप्रेमी संस्थेतर्फे आता पर्यंत,माउंट कून 7077 मी.,माउंट चो यू 8201मी.जगातील 6वे उंच ,माउंट कांचनजुंगा 8586मी., जगातील 3रे उंच माउंट अन्नपूर्णा 8092मी., जगातील 10वे उंच शिखर माउंट मेरा 6476मी.,माउंट स्टोक कांग्री 6153मी.या शिखरांवर यशस्वी चढाई.केली आहे तर मनाली ते लेह सायकल एक्सपेडिशन, त्याच बरोबर शिखर सर करताना अनेक गिर्यारोहकांचे रेस्क्यू चे काम व त्यांच्यावर उपचार करण्याचे काम डॉक्टर सुमित सुरेश मांदळे यांनी केले आहेे.
ही मोहीम सर केल्याबद्दल अवसरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने त्याचे कौतुक केले जात आहे.