आंबेगाव तालुक्यात 14 गावे हॉटस्पॉट म्हणून घोषित- तहसीलदार रमा जोशी……

5697

आंबेगाव तालुक्यात 14 गावे हॉटस्पॉट म्हणून घोषित झाले असल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.आंबेगाव तालुक्यात अवसरी बुद्रुक,अवसरी खुर्द,धामणी,घोडेगाव,गिरवली,मंचर, नारोडी,निरगुडसर,पारगाव,पिंपळगाव, रांजणी व शिंगवे ही गावे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली असली तरी मागील वेळेस ही गावे हॉटस्पॉट यादीत होती तर नव्याने चांडोली बुद्रुक व देवगाव ही गावे नव्याने हॉट स्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहे.
नागरिकांनी दररोजचे आपले व्यवहार काम करताना सोशल डिस्टन्स चे नियम पाळूनच कामे करावी, विनाकारण गर्दी होईल अशी कामे करू नयेत, आपल्या स्वतः बरोबर समाजाची काळजी घ्यावी.
मागील बऱ्याच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता प्रशासनाने पुन्हा हॉटस्पॉट गावे घोषित केली आहेत या गावांबाबत प्रशासन काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे, त्यातच प्रशासनाने 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत तर नवरात्र पासून मंदिरेही खुली होणार आहेत.