घोडेगाव पोलीसांच्या वतीने “वाहन चालक दिन ” उत्साहात साजरा ..

224

सिताराम काळे

– देशाच्या प्रगतीत वाहन चालकांचे मोठे योेगदान आहे. या घटकांचा सन्मान व्हावा व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी “चालक दिनाचे ” औचित्य साधत घोडेगाव पोलीस ठाण्यात माल वाहतूक चालकांचा सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी गुलाब पुष्प देऊन गौरव केला.

देशाच्या प्रगतीत वाहन चालकांचे योगदान मोलाचे आहे. कारण दळवळणां शिवाय सर्व ठप्प होऊ शकते. मात्र हा घटक तेवढाच दुर्लक्षित आहे. त्याची दखल घेऊन या घटकांचा सन्मान व्हावा व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात चालक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, सतिष कौरे, पोलीस फौजदार नवनाथ वायाळ, बाळासाहेब पवार, पोलीस हवालदार दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर, संदिप लांडे, आतिष काळे, जालिंदर ढेंगळे आदि पोलीस बांधवांनी वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.

घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालवाहतूक रिक्षा, पिक -अप, टेंम्पो आदि चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना वाहतूक नियम तसेच प्रवासी महिला सुरक्षा संदर्भाने मार्गदर्शन केले. तसेच अंधारात रस्त्यावर चालणारी किंवा उभी असलेली गाडी दिसावी यासाठी गाडीच्या मागील बाजुस रेडिअम रिफ्लेक्टर लावावे. शिस्तबध्द वाहतुकीसाठी स्वयंशिस्त व नियम, कायदयाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले.