घोडेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात मटका व दारू विक्री करणा-यांवर कारवाई ..  

824

सिताराम काळे

– घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाणे हद्दीत पोलीसांनी दोन वेगवेगळया केलेल्या कारवाईमध्ये बोरघर येथे बेकायदा बिगर परवाना दारू विक्री करणा-यावर एकावर व घोडेगाव येथे मटका नावाचा जुगार खेळत असताना दोघांवर कारवाई केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोरघर गावचे हद्दीत शेळकेवाडी येथे रोहिदास नारायण शेळके (वय -३६) रा. शेळकेवाडी हा आपल्या नवीन घराचे बांधकामाचे भिंतीचे आडोशाला बिगर परवाना विदेशी कंपनीची दारू विक्री करत होता. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार अविनाश कालेकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली.

दुस-या घटनेमध्ये घोडेगाव येथे चावडी चौक येथे पिंपळाच्या झाडाखाली मोकळया जागेत शत्रुंजय बळीराम वाघमारे रा. घोडेगाव हा पिंटु शेवाळे रा. लांडेवाडी (ता. आंबेगाव) याचे सांगणेवरून लोकांकडून पैसे घेऊन त्यांना चिट्टया देवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असताना भेटला. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई नामदेव ढेंगळे यांनी पोलीस ठाण्यात दिली.