घोडेगाव येथे नायरा पेट्रोल पंपाचे उद्घाटन दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांचे हस्ते संपन्न..

1881

सिताराम काळे

– आंबेगाव, जुन्नर, खेड असा एकमेव भाग आहे. जिथे मराठी माणसाला महाराष्ट्रात शेठ म्हणतात. मराठी माणूस विविध क्षेत्रात मोठा झाला पाहिजे, यासाठी आपण आढळराव पाटलांकडे एक मार्गदर्शक म्हणून पहा, असे मत दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांच्या श्री महालक्ष्मी सर्व्हिस स्टेशन नायरा पेट्रोलियम ऑईल रिफायनरी पेट्रोल व डिझेल विक्रीच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन घोडेगाव येथे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख शरद सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.