तीन पत्ती जुगार खेळणा-या आठ जणांवर घोडेगांव पोलीसांनी केला गुन्हा दाखल ..

1114

सिताराम काळे

– आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील फुलवडे येथे तीन पत्ती नावाचा जुगार खेळणा-या आठ जणांना घोडेगाव पोलीसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.8

फुलवडे गावच्या हद्दीत जिल्हा परिषद शाळेच्या पुढे हिलेवाडी रस्त्याच्या कडेला गुलाब बनाजी मोहरे यांचे घराचे पुढचे पडवीमध्ये हे दि. २५ रोजी ४.३० वाजण्याचे सुमारास नामदेव किसन मोहरे (वय-५९), अशोक किसन भारमळ (वय-४२), गणेश गोविंद मोहरेे (वय-४०), सुरेश सोमा मोहरे (वय-४०), गुलाब बनाजी मोहरे (वय-५०), काशिनाथ मारूती मोहरे (वय-५०) , खंडू किसन भारमळ (वय-३५), हनुमंता तुकाराम उघडे (वय-५०) सर्व रा. फुलवडे, ता. आंबेगाव येथे तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना भेटले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई नामदेव ढेंगळे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल बकरे करत आहे.