फार्मासिस्ट दिनानिमित्त जॅक मेडिको हेल्थ केअरच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 160 रक्तदात्यांचा सहभाग…..

314

मंचर (ता.आंबेगाव )येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त जॅक मेडिको हेल्थ केअरच्या वतीने बुधवार ता.२५ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात १६० रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.
या शिबाराचे आयोजन सिद्धी हॉस्पिटल मंचर येथे करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे उद्घाटन मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, मंचर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय घुले ,आंबेगाव तालुका डॉक्टर असोसिएशनचे डॉ अतुल शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
या प्रसंगी महाराणा प्रताप अकॅडमी चे गणेश शिंदे ,पुणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट चे सदस्य संदीप कोरडे,जॅक मेडिको चे प्रकाश बांगर ,मुकुंद काळे,सचिन काळे, बाबूशेठ कुऱ्हाडे, प्रदीप घुमटकर,विक्रम करंजखेले आदी मान्यवर उपस्थित होते. शिबारा दरम्यान मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, आंतराष्ट्रीय व्यवसाय मार्गदर्शक दिलीप औटी , दौंड केमिस्ट असो. राहुल वागसकर, निलेश जगदाळे , इ मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या
सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.त्यामुळे शासना मार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे आवाहन केले होते त्यामुळे जॅक मेडिको हेल्थ केअर ने ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ हा अन्य आनंद उत्सव साजरा करण्या पेक्षा रक्तदान शिबिराचे आयोजन केले
पिंपरी चिंचवड च्या पी एस आय या रक्त पिढीने रक्त संकलन केले असून शिबिराची सर्व व्यवस्था कमलाकर एरंडे, योगेश बढेकर, किरण हांडे, नूतन वळसे यांनी पाहिली. शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांस प्रमाणपत्र व थर्मास बॉटल भेट देण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश शेवाळे , सूत्रसंचालन अंकुश भूमकर व आभार भगवान हांडे यांनी मानले.