मंचर पोलिसांची कारवाई,370 ग्रॅम गांजा जप्त….

323

मंचर पोलिसांनी मंचर येथील छत्रपती शिवाजी चौकातील मोमिन गल्ली येथे धाड टाकत अंदाजे पाच हजार रुपये किमतीचे 370 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
पोलीस नाईक राजेंद्र हिले यांनी तक्रार दाखल केली आहे.
मंचर पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांना बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक आरबी बांबळे, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक रुपाली पवार, पोलीस नाईक राजेंद्र हिले, पोलीस जवान एस.एन.नाडेकर, एस.एस.माताडे,एस.एन.शिंदे यांनी कारवाई साठी लागणारे साहित्य घेऊन दि.24 रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गेले असता छत्रपती शिवाजी चौकातील मोमीनगल्ली येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये सलमान हसन सय्यद (वय 26) याच्याकडे पारदर्शक पिशवीमध्ये हिरव्या रंगाचा गांजा आढळून आला, आढळून आलेला गांजा हा 370 ग्रॅम अंदाजे पाच हजार रुपये किमतीचा आहे, विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली आहे.