क्रीडा संकुल मंचर येथे देवेंद्र शेठ शहा यांच्या हस्ते वृक्षारोपण व वृक्षादिंडी चे आयोजन व विकासकामांची पहाणी…

250

क्रीडा संकुल मंचर येथे शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा  यांचे हस्ते वृक्षारोपण व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर त्यांनी क्रीडासंकुल मंचर याठिकाणी सुरू असणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेऊन कामे वेगाने पूर्ण करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

यावेळी तहसीलदार रमा जोशी, पोलिस निरीक्षक सतीश होडगर, सहा.पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, तालुका क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, कनिष्ठ अभियंता राहुल हेंडके, संकुल समिती सदस्य ऍड राहुल पडवळ, व्यवस्थापक समीर ढेरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
या वेळी जिम्नॅस्टिक साहित्य व कुस्ती मॅट करता 25 लाख रुपयांचा प्रस्ताव देण्याचे ठरले, तर संकुलातील बॅडमिंटन हॉल च्या नूतनिकरणाबाबत चर्चा झाली व तसा प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे ठरले. कोविड मुळे जलतरण तलाव गेले दीड वर्ष बंद असून त्यात त्यातही दुरुस्तीची कामे हाती घेऊन शासन निर्णयानुसार तो सुरू करण्यासाठी सज्ज ठेवण्याचे ठरले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.