सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल…

256

लोणी ता. आंबेगाव येथील बागवस्ती येथे महावितरणचे अधिकारी जयंत धनराज गेटमे यांना रोडवर अडवून शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ करत गाडीवर दगड फेकून मारण्याची घटना दिनांक 19/10/2021 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत संजय लक्ष्‍मण पडवळ रा. लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्यावर सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयंत गेटमे हे दि.19 रोजी लोणी ते वाफगाव रोडवर त्यांच्या इको गाडीतून जात असताना त्या ठिकाणी संजय पडवळ यांनी त्यांची गाडी इको गाडीला आडवी लावून फिर्यादीच्या जवळ जात त्याला गाडीच्या बाहेर ये म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली तसेच शर्टाची कॉलर पकडून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीच्या गाडीच्या काचेवर दगड मारून गाडीची काच फोडून गाडीचे नुकसान केले आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा याप्रकरणी पडवळ यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.