बाबा श्री खेतानाथजी अवधूत योगीराज यांची ३३ वी पुण्यतिथी व श्री शैलेश्वर महाराज यांचा १९ वा वर्धापन दिन दि.२२/१/२०२४ सद्गुरु श्री श्री १००८ योगी बाबा रविदास उर्फ खडेश्वरी महाराज यांचे समाधी स्थान असलेल्या गोरक्षनाथ टेकडी अवसरी फाटा मंचर ता. आंबेगाव येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीमंत योगी कृष्णनाथजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये दि.२२ रोजी सकाळी सात वाजता होमहवन, साडे दहा वाजता पालखी मिरवणूक, साडे अकरा वाजता पादुका पूजन, दुपारी एक वाजता महाप्रसाद, व रात्री नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या नियोजित कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त विश्वस्त व सेवक मंडळ श्री गोरक्षनाथ टेकडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.