शिरुर-आंबेगाव तालुक्यासाठी गेटेड साठवण बंधारा बांधकाम, योजनेसाठी रु.१० कोटी १२ लक्ष मंजूर..

1109
Google search engine

महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत सन २०२२-२३, गेटेड साठवण बंधारा बांधकाम करणे, ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या शिरुर-आंबेगाव तालुक्यात एकूण १४ गेटेड साठवण बंधारा, योजनेसाठी रु.१० कोटी १२ लक्ष मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

करंदी- कदम वस्ती (शिरुर)- रु.२१ लक्ष ५३ हजार, हिवरे (शिरूर) साळुंखेवस्ती क्र.१ – रु. २५ लक्ष ६४ हजार, सविंदणे – बनाचा ओढा (शिरूर) – रु.४१ लक्ष ३४ हजार, खैरेवाडी पांढरी ओढा (शिरूर) – रु.२२ लक्ष ५५ हजार, ठाकरवाडी गोसावीमळा (आंबेगाव) – रु. ३२ लक्ष, ठाकरवाडी काळमाथा (आंबेगाव) – रु. ३० लक्ष ८३ हजार, साल पाणीपुरवठा विहीर जवळ (आंबेगाव) – रु. २३ लक्ष ४४ हजार, साल, बाभूळवाडी पूल (आंबेगाव) – रु. २५ लक्ष ३४ हजार, वाळुंजनगर, पट्टीचामळा (आंबेगाव) – रु. ३२ लक्ष ७३ हजार, लोणी, शहा शेताजवळ (आंबेगाव) – रु. ३१ लक्ष १३ हजार, काळेवाडी, स्मशानभूमीजवळ (आंबेगाव) – रु. २५ लक्ष ३३ हजार, महाळुंगे पडवळ, काळदरा क्र.४ (आंबेगाव) – रु. २९ लक्ष २६ हजार,केंदूर थिटेवाडी (शिरुर) – रु. २ कोटी ८१ लक्ष ३५ हजार, धामणी (पहाडदरा – कुरकुटदरा) (आंबेगाव) – रु.३ कोटी ९० लक्ष.

Google search engine