नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आलेल्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहण्याची वेळ आता येणार – सचिन अहिर….

538
Google search engine

आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत असलेले त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहण्याच आता वेळ येऊ नये, ज्यावेळी पक्षप्रमुखांनी पाहिजेल त्या गोष्टी दिल्या अडचणीच्या काळात तुम्ही आम्हाला सोडून गेले त्याचा वाचता शिवसैनिक आता काढल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीचा विधानसभेवर भगवा फडकल्याशिवाय राहणारच नाही असे प्रतिपादन शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केले.

कळंब ता. येथील तिरंगा मंगल कार्यालय येथे जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शाखाप्रमुख बूथप्रमुख व पदाधिकारी यांची एक दिवसीय कार्यशाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना उपनेते सचिन आहीर, उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेते रघुनाथ कुचिक हे होते.
यावेळेस बोलताना अहिर म्हणाले आज मकर संक्रांत आहे सणासुदीचे दिवस असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित आहेत याचा अर्थ पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामकाजावर महिलांचा विश्वास आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रह बदलत असतात तसे आता राजकीय गृह देखील बदलाचे वारे सुरू झाले आहे, आमच्या पक्षाची भूमिका ही मुहमे राम बगल मे सुरी अशी नाही. आमचे हिंदुत्व मुहमे राम हाताला काम असे आहे. निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार असेल त्याचा पक्षप्रमुखांच्या आदेशाने प्रचार करावा लागेल परंतु विधानसभेला राज्यावर भगवा फडकवायचा आहे, महिलांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भाऊ किंवा मुलगा या नात्याने आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळेस अहिर यांनी केले.

मिर्लेकर म्हणाले भाजपने महाराष्ट्राचे वाटोळे केले. शिवसेनेचा हात धरून भाजप मोठी झाली. इतिहास घडविणारी जनता आहे. जे गेले ते चांगले झाले. शिवसेनेचा जन्म आंदोलनातून झालेला आहे. आक्रमक भूमिकेतून प्रशासनाला वठणीवर आणण्याचे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे. जनतेला उद्धव ठाकरे यांचा आधार वाटतोय.

या शिबिरासाठी जिल्हाप्रमुख सुरेश भोर, श्रद्धा कदम, दिलीप पवळे, दत्ता गांजाळे, राजाराम बाणखेले, माऊली खंडागळे, अविनाश बलकवडे, बाबू पाटे, संतोष दांगट, संभाजी तांबे, सचिन लबडे, दिलीप चासकर, किरण देशमुख, बन्सी चतुर, अरुण बाणखेले, शरद चौधरी, प्रज्ञा भोर, सुरेखा निघोट, कलावती पोटकुळे, संदीप शिंदे, नितीन भालेराव, रूपाली भालेराव, दिलीप बामणे, मंगल राऊत, जोस्त्ना महाबरे, नंदू बोराडे, रोहन कानडे शिवसैनिक व महिला शिवसैनिक, युवा शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळेस आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील अनेक युवक व महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राष्ट्रवादीतून प्रवेश केला.
उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, दिलीप पवळे, माऊली खंडागळे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन संदीप वाबळे यांनी केले.

Google search engine