समाजातील दिव्यांगजणांना सक्षम बनविणे काळाची गरज – दिलीप वळसेपाटील….

137
Google search engine

समाजातील दिव्यांग मुलांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेचे, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे आयोजित फियाट ऑटोमोबाईल्स प्रा. लिमिटेड रांजणगाव यांच्या वतीने CSR फंड उपक्रमांतर्गत सक्षम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम अवयव व संसाधने वाटप शिबीर प्रसंगी बोलत होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले, समाजामध्ये अनेक मुलं हे दिव्यांग असल्याने एक शारीरिक दिव्यांग व त्यातून निर्माण होणारा मानसिक न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असल्याने अशा मुलांना समाजात सक्षमपणे उभे करण्यासाठी फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लिमिटेड रांजणगाव या सारख्या कंपनीने पुढे येऊन आज जुन्नर, आंबेगाव व खेड या तीन तालुक्यातील दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयवे व संसाधने वाटप केल्यामुळे निश्चितच या दिव्यांग जणांच्या जीवनात एक आशेचा किरण निर्माण होईल व त्यामुळे हे दिव्यांग विद्यार्थी पुढे सक्षमपणे जीवन जगू शकतील, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
या शिबिरा प्रसंगी फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लिमिटेड रांजणगावचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बवेजा, सहाय्यक उपाध्यक्ष संचिता कुमार,  मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, प्रदीप मुनगंटीवार, गट शिक्षण अधिकारी सविता माळी गट शिक्षण अधिकार, अर्चना कोल्हे, प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब बाणखेले, उदय पाटील, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड आदि उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा. राकेश बवेजा म्हणाले. फियाट कंपनी द्वारे CSR फंडातून दिव्यांग जन विदयार्थ्यांना कृत्रिम अवयव व संसाधने वाटप करण्याची संधी मिळणे हा आमच्या कंपनीसाठी भाग्याचा क्षण आहे, असे बहुमोल विचार त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी  रमेश चव्हाण यांनी या वेळी फियाट कंपनीच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. तसेच फियाट कंपनी च्या सहाय्यक उपाध्यक्ष संचीता कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरात एकूण १५३ दिव्यांग विध्यार्थ्यांना दिलीप वळसे पाटील, राकेश बवेजा यांच्या शुभहस्ते कृत्रिम अवयव व संसाधनांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत  राकेश बवेजा यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नानासाहेब गायकवाड यांनी केले . या कार्यक्रमासाठी दिव्यांग विद्यार्थी, पालक शिक्षक,मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा महाकाळ प्रा. कैलास एरंडे यांनी केले.

Google search engine