महाविद्यालयीन विद्यार्थीनी संगणकाचे ज्ञान, व कौशल्य आत्मसात केले तर भविष्यात उत्तम संधी उपलब्ध आहेत असे प्रतिपादन मा. नामदार दिलीपरावजी वळसे -पाटील, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केले.
अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर येथे “फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव यांच्याकडून सी. एस.आर फंडातून महाविद्यालयांस 40 संगणक भेट देण्यात आले त्यातून महाविद्यालयात संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली. या प्रयोगशाळा उदघाट्न प्रसंगी दिलीपरावजी वळसे -पाटील बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी राकेश बवेजा (वरिष्ठ उपाध्यक्ष फियाट प्रा. लिमिटेड कंपनी रांजणगाव), संचिता कुमार (सहायक उपाध्यक्ष फियाटप्रा. लिमिटेड कंपनी), जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस. गायकवाड. रयत जनरल बॉडी सदस्य उदय पाटील, बाळासाहेब बाणखेले, आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रम प्रसंगी बोलतांना वळसेपाटील म्हणाले फियाट कंपनीच्या माध्यमातून मिळालेले संगणक संच, याचा फायदा महाविद्यालयीन विद्यार्थीनी चांगल्या पद्धतीने करून घ्यावा. व स्वतः रोजगार निर्मिती करून सक्षम बनावे
या कार्यक्रम प्रसंगी राकेश बवैजा. व त्याचें अधिकारी वर्ग यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस. गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विद्यार्थी वर्ग, प्राध्यापकवृंद, मोठया संख्येने उपस्थित होते.