अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील वंडर किड्स प्रि स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये बालचमूनी आपल्या नृत्य अविष्काराने आलेल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी वार्षिक स्नेहसंमेल “त्रिबूट टू लीजेंडरी सिंगर अ म्युझिकल जर्नी ” या विषयावर आधारित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील विविध दिग्गज गायकांनी गायलेल्या गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केले. तसेच प्रभू रामचंद्रांचे आगमन या विषयावरील नृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. उपस्थितांनी बालचमुंच्या कलागुणांना प्रोत्साहन देत बक्षीसांचा वर्षाव केला. अध्यक्ष योगेश लिंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका पूनम खेडकर ,पायल काळे ,तेजल शिंदे, सुरेखा शिंदे व नूतन राऊत यांनी केले.
या कार्यक्रमासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे, अवसरी बुद्रुक च्या सरपंच सारिका हिंगे, निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त शांताराम अभंग, पोलीस पाटील संतोष शिंदे, उद्योजिका सुरेखा टाव्हारे , माझी उपसरपंच कल्याण शिंदे, शरद बँकेचे माजी संचालक शांताराम टेमकर, मयूर पतसंस्थेचे अध्यक्ष देवेंद्र जंगम, मयूर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हरिदास रामवत सर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत स्कूलचे समन्वयक दीपक टेंबेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूलच्या मुख्याधिपिका शुभांगी लिंगे यांनी केले.