वयाच्या सत्तरी पुढे आम्हाला मुभा देणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार…

Google search engine

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून आंबेगाव शिरूरमधील 1157 कोटी रुपयांची 653 विकासकामे मार्गे लागली आहेत. विरोधी पक्षात असतो तर ही कामे झाली असती का? वैयक्तिक स्वार्थापोटी आम्ही सत्तेत येण्याचा निर्णय घेतला नाही.बेरजेचे राजकारण करताना आम्ही विचारधारा सोडली नाही.आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला येण्याची दाट शक्यता आहे महायुती मिळून जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंचर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अतुल बेनके, विलास लांडे, भगवान पासलकर, केशर पवार, मंगलदास बांदल, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, सुषमा शिंदे ,युवराज बाणखेले, शंकरशेठ पिंगळे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सभेला विकासाची वज्रमुठ सभा असे संबोधून ते म्हणाले आम्ही कधीही चुकीचे करणार नाही. 32 वर्षांपासून तुमचे प्रेम व आशीर्वादावर या भागाचा, राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून 1157 कोटी रुपयांची विकासकामे या भागात झाली आहेत. विरोधी पक्षात असतो तर ही कामे झाली असती का असा सवाल करून ते म्हणाले वैयक्तिक स्वार्थापोटी सत्तेत गेलो नाही. तर तरुणांना माता-भगिनींना मदत व्हावी यासाठी बेरजेचे राजकारण करत सत्तेत सहभागी झालो असलो तरी विचारधारा सोडली नाही. कोणाला त्रास देण्याचा किंवा कमी लेखण्याची शिकवण आम्हाला नाही आम्ही वडीलधाऱ्यांचा आदरच करतो. मात्र वडीलधाऱ्यांनी आम्हाला मुभा दिली पाहिजे.आता साठ वर्षापेक्षा जास्त वय झाले मग मुभा सत्तरीच्या पुढे देणार का तुमची दुकान आणि शेती असेल तर तुम्ही पुढच्या पिढीतल्या मुलाला सनी देता की नाही मग माझा विचार का होत नाही असा सवाल करून पवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुती देईल त्या उमेदवाराला निवडून आणा .शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला येण्याची दाट शक्यता आहे. आपण मागे राहता कामा नये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. विकासाला साथ देणाऱ्या महायुतीचा खासदार निवडून द्या. मतभेद न करता एक दीलाने कामाला लागा असेही आव्हान त्यांनी केले. खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता त्यांच्यावर पवारांनी टीका केली. त्यांना राष्ट्रवादीत घेतले, उमेदवारी दिली. ते निवडून आले मात्र त्यांनी मालिका जोरात सुरू ठेवली. दोन वर्षांपूर्वीच ते राजीनामा देण्यासाठी आले होते. धंद्यावर, कलेवर परिणाम होत असल्याचे ते म्हटले होते. मात्र कलेवर परिणाम होईल असं म्हणणारी माणसे उपयोगी पडत नाही असा टोला पवार यांनी लगावला. मी अभिनयाला भुललो पण खासदार झाल्यावर माझे डोळे उघडले असे पवार म्हणाले.

Google search engine