ऐकिव माहितीवर जाऊ नका. माझ्यासाठी मंत्रीपद , आमदारकी महत्त्वाची नाही मला फक्त तालुक्याचे परिवर्तन झाले ते बिघडणार नाही हा भाग पुन्हा दुष्काळी होणार नाही याची काळजी करायची आहे असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
मंचर येथे आयोजित विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ व शेतकरी मेळावा आयोजित केला होता यावेळी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील बोलत होते ते पुढे ते म्हणाले जे करीन ते समाजाच्या हितासाठीच करीन त्यात दुसरा स्वार्थ असणार नाही असे वळसे पाटील यांनी नमूद केले. आगामी विधानसभा निवडणुकीची काळजी करू नका. काही कार्यकर्ते उगाचच चेष्टा करतात.याच्या घरी गेला, बोलला स्टेटस ठेवले या सगळ्या प्रश्नावर विधानसभा निवडणूक होणार नाही. आजचा मेळावा कुकडी पाणी प्रशासंदर्भात असल्याचे नमूद करून वळसे पाटील म्हणाले 2018 साली मी विरोधी पक्षात असताना एक पत्र सहीला आले. त्या पत्रात एवढेच दिले होते की डिंभे धरण पूर्ण झाल्यानंतर नदीतून जाणारे अतिरिक्त पाणी बोगद्यातून त्या धरणात नेण्यास हरकत नाही. काही लोक त्याचा वेगळा अर्थ काढायला लागले. आता जो प्लॅन केला आहे तो मंजूर झाला तर तीन महिन्यात डिंभे धरण रिकामे होईल उपमुख्यमंत्री अजित पवार ,मी स्वतः व इरिगेशन सेक्रेटरी यांच्या बैठकीत या संदर्भात भूमिका मांडल्यानंतर आता याला ब्रेक लागला आहे. तीन महिन्यात धरणातील पाणी संपले तर तीन नद्यावरील 65 बंधाऱ्यात पाणी येणार नाही. असे सांगून वळसे पाटील म्हणले म्हणाले काही लोक म्हणतात तुम्ही पक्ष सोडला, गद्दारी केली .मात्र साहेबांचे प्रेम माझ्यावर कालही होते व आजही आहे उद्या राहील. एवढे सांगून हा सत्तेत जाण्याचा निर्णय अजित पवार, दिलीप वळसे यांचा एकट्यांचा नसून पक्षाच्या बैठकीत बसून 52 आमदारांनी विचार करून भूमिका ठरविली आहे. भीमाशंकर कारखान्याची बदनामी करण्याचे काम काही लोक करतायेत. शेतकऱ्यांना फितवून आणखी पैसे मागा, गावोगावच्या जत्रांमध्ये जाऊन लोकांची फसवणूक सुरू आहे. आणखी काही कुलूप त्या काढल्या जात आहेत .मात्र मी लहान गोष्टीला महत्त्व देत नसल्याचे वळसे पाटील म्हणाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व मी तीस वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात आहे. पंधरा वर्षे एकत्र पक्षात काम केले. मात्र 2004 सालापासून आढळराव पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला. पंधरा वर्षे विरोधात लढलो मात्र दोघांनी एकदाही एकमेकांवर वैयक्तिक टीका केली नाही. अथवा एकाही संस्थेची बदनामी केली नाही असे सांगून तुम्हाला सगळे मिळाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी संस्थेची बदनामी करायला लागलात. तुमच्या प्रयत्नातून एखादी पतसंस्था तरी सुरू केली का? असा सवाल वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांचे नाव न घेता केला. पद मिळाल्यानंतर गावागावात जाऊन गट निर्माण करण्याचे काम तुम्ही केले असा आरोप त्यांनी केला. ऐकिव माहितीवर जाऊ नका. माझ्यासाठी मंत्रीपद ,आमदारकी महत्त्वाची नाही मला फक्त तालुक्याचे परिवर्तन झाले ते बिघडणार नाही हा भाग पुन्हा दुष्काळी होणार नाही याची काळजी करायची आहे असे ते म्हणाले. जे करीन ते समाजाच्या हितासाठीच करीन त्यात दुसरा स्वार्थ असणार नाही असे वळसे पाटील यांनी नमूद केले.