लोकसभेला जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार निवडून द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार….

 जाहिरात

सिताराम काळे.

– शिरूर लोकसभेची जागा लवकरच जाहीर होईल महायुतीच्या तिन्ही पक्षाचा कार्यकर्त्यांनी उमेदवाराला विक्री मतांनी निवडून देण्यासाठी कामाला लागा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोडेगाव येथे केले.

घोडेगाव येथे पोलीस अधिकारी व अंमलदार निवासस्थान बांधकामाचा उद्घाटन समारंभ अजित पवार राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्योजक देवेंद्रशेठ शहा, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे अधीक्षक अभियंता बी एन बहिर कार्यकारी अभियंता आर वाय पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भालेकर उप अभयंता सुरेश पठाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पोलीस निवासस्थानाची इमारत अतिशय सुंदर झाली असून येथे मोठ्या प्रमाणात झाडे लावा संपूर्ण वसाहतीत झाडांनी झाकून टाका परिसर स्वच्छ ठेवा असे पोलिसांना आवाहन केले. नुकतेच जिल्ह्यातील पोलिसांसाठी चार कोटी रुपयांच्या नवीन गाड्या दिल्या आहेत. पोलिसांना दररोज अनेक अडचणींना तोंड देत ड्युटी करायला लागते. पोलिसांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आमचे सरकार लक्ष घालत असून घोडेगाव पोलीस कर्मचारी यांच्यासाठी झालेल्या निवासस्थानाप्रमाणे निवासस्थाने उभारण्याचे काम या सरकारने हाती घेतले आहे .

 

यावेळी घोडेगाव ग्रामीण रुग्णालय बांधकाम करणे घोडेगाव बस स्थानक बांधकाम करणे घोडेगाव येथे आदिवासी मुलींसाठी वसतिगृहचे बांधकाम करणे आदर्श आश्रम शाळा तयार करणे इत्यादी १२५ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

 जाहिरात