जुन्नर वन विभागात ३९ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित-वन विभागाची कार्यवाही…

471
Google search engine

वनविभाग जुन्नर अधिनस्त मंचर वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलेल्या आंबेगाव तालुक्यात मौजे काठापूर बुद्रुक येथे १७ हेक्टर आणि मौजे थोरांदळे येथे २२ हेक्टर असे एकूण ३९ हेक्टर (शंभर एकर) क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही वन विभागाने केली आहे.

जुन्नरचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील यांच्या मदतीने सहायक वनसंरक्षक अमित भिसे, संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, प्रदीप रौंधळ, महेश गारगोटे, वैभव काकडे, प्रदिप चव्हाण, संतोष कंक यांच्यासह क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यवाही करण्यात आली.

वनविभाग जुन्नर अधिनस्त मंचर वनपरिक्षेत्रातील मौजे काठापूर बुद्रुक, वनक्षेत्र वन कक्ष क्रमांक २५० मधील गट क्रमांक १४५ व १४६ येथील १३ झोपड्या, पाईपलाईन, शेती, केळीची बाग मिळून क्षेत्र १७ हेक्टर तसेच मौजे थोरांदळे येथील वन कक्ष क्रमांक २३९ (जुना-१११), गट क्रमांक ५५२ येथील २२ झोपड्या क्षेत्राची वनहक्क दाव्याची नियमानुसार कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करण्यात आली. तसेच त्यांना नैसर्गिक न्यायाची पुरेशी संधी दिल्यानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अतिक्रमण निष्कासित करण्यात आले.

अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूळगावी विस्थापित करण्यासाठी वनविभागाच्या संबंधिताना मदत करण्यात आली. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आली आहे.

Google search engine