मंचर शहरातील पुरातन पांडवकालीन बारवचे जल पूजन…

417

मंचर शहरातील पुरातन पांडवकालीन बारवचे जल पूजन महंत योगीअजयनाथजी महाराज व महंत योगी मिरची नाथजी महाराज, महंत योगी तुफाननाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं, जल जिव्हाळा ग्रुप च्या सर्व सदस्यांनी मिळून या बारवेची साफसफाई व यातील साठलेला गाळ पडलेले दगडी ह्या सर्व गोष्टींची सात ते आठ दिवस साफसफाई बारवेत उपजत असलेले जल स्रोत मोकळे केले आलेल्या पाण्याचे जलपूजन साधू महंतांच्या हस्ते करण्यात आले.
या पुरातन बारवेचे साफसफाई चे काम जल जिव्हाळा परिवाराचे डॉ. कडधेकर यांनी पुढाकार घेऊन नंदकुमार पडवळ, राजू निराळी, धनेश राऊत, नंदकुमार जंगले, मिलिंद नाटे, जयसिंग थोरात, जयसिंग भेेके, नवनाथ थोरात, सागर पंधारे, नितीन बागल, दैने मामा, पंकज शेटे, आतिश काजळे, सागर पंधारे, व ग्रामस्थांनी केले.
जल पूजनासाठी तीन स्थानिक नद्यांचे पाणी व शरयू घाट अयोध्या येथील पाणी व काशी गंगा नदीचे पाणी अशा पाच नद्यांचे पाणी पुजनासाठी आणण्यात आले होते, यावेळी मंचर नगरपंचायत चे मुख्य अधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते. त्यांनी मंजूर झालेला फंड कशाप्रकारे वापरण्यात येईल व या वास्तूचा आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यात येईल या संदर्भात सर्वांना माहिती दिली, जलपूजनासाठी पराग उद्योग समूहाचे देवेंद्र शहा, बाळासाहेब बेंडे, संजय थोरात, संदीप बाणखेले, सुनील बाणखेले, नरेंद्र समदडिया, लक्ष्मण थोरात भक्ते, सुहास बाणखेले, योगेश बोऱ्हाडे, आशिष पुंगलिया, संजय चिंचपुरे, सुरज धरम, स्वप्ना पिंगळे, छाया थोरात, जागृती महाजन, विशाल थोरात, बंगाळ गुरुजी व ग्रामस्थ उपस्थित होते.