मंचर नगरपंचायतीसाठी अजितदादा पवारांनी दिले पंधरा कोटी – देवेंद्रशेठ शहा.

Google search engine

मंचर : राज्यातल्या राजकीय घडामोडी बदलत असताना आंबेगाव तालुक्यातील जनतेने तसेच मंचर शहराने दाखवलेल्या आपुलकीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंचर नगरपंचायत विविध विकास कामांसाठी अतिरिक्त पंधरा कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा यांनी दिली.

कोरोना काळानंतर मंचर नगरपंचायत स्थापन झाली, अद्यापही या नगरपंचायतीवर प्रशासन आहे, स्थानिक नगराध्यक्ष अथवा नगरसेवक नसल्यामुळे अनेक विकास कामे करण्यासाठी अडचण निर्माण होते ते मात्र सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष देऊन महायुती सरकार स्थापना झाल्यापासून मंचर शहरासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मंचर नगरपंचायत चा विकास व्हावा यासाठी 46 कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर केली होती, चार फेब्रुवारी रोजी आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामे तसेच शेतकरी मेळाव्यासाठी अजित पवार हे आले असता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मंचर शहरवासीयांनी अजित दादांवर दाखवलेले प्रेम त्यांच्यावर दाखवलेली निष्ठा त्याच बरोबर वळसे पाटील यांच्यावर असलेली निष्ठा अजितदादांनी पाहिल्यानंतर तात्काळ मंचर शहरवासीयांच्या असणाऱ्या मागण्या मान्य करत मंचर शहरासाठी अतिरिक्त पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. याबद्दल मंचर शहरवासीयांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री वळसे पाटील यांचे आभार व्यक्त केले व मंचर येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

Google search engine