देशासह, राज्यात नावाजलेल्या असलेल्या आघाडीची दुग्ध संस्था पराग मिल्क फूड्स लि (पीएमएफएल), ब्रँड गोवर्धन या कंपनीने काजू कतरी, मलई पेढा, केसर पेढा हि भारतीय मिठाई बाजारात आणली असून ब्रँड यांचा उद्घाटन सभारभ दिनांक ११ रोजी विवीध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. गाईच्या शुद्ध दुधापासून आणि गोवर्धन तूपाने घडवलेली हि मिठाई देशभरातील खवय्यांच्या तोंडाला पाणी सोडणार आहे.
ग्राहकांच्या बदलत्या आवडी लक्षात घेऊन, पराग मिल्क फूड्स लि. यांनी भारतीय मिठाई क्षेत्रात पदार्पण केले आहे. या मिठाई २५० ग्रॅम पॅकची किंमत अनुक’मे रु २७५, रु १५० आणि रु १०० आहे. यावेळी कंपनीच्या या पदार्पणाविषयी बोलताना पराग मिल्क फूड्स लि. चे सभापती देवेंद्र शहा म्हणाले, “भारतीय मिठाई बाजारात कमालीचा बदल होताना दिसतो आहे, ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर ब्रँडेड, पॅकेज केलेली उत्पादने हवी आहेत. गोवर्धन घी ब्रँडसाठीचे हे पुढचे पाऊल आहे. आमच्या या क्षेत्रातील प्रवेशासह, आम्ही भारताच्या पारंपरिक मिठाई बाजारात प्रवेश करून आमच्या मूल्यवर्धित उत्पादनांचा संच वाढवण्याचे ध्येय बाळगून आहोत.”
गायीच्या दुधापासून आणि गोवर्धन तुपामध्ये घडवलेल्या या लज्जतदार मिठायांची कठोर गुणवत्ता चाचणी केली जाते आणि स्वच्छतेचे आणि ताजेपणाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले आहेत का ह्याची पडताळणी होते. ६० दिवस टिकू शकतात.
काजु कतली, मलई पेढा आणि केसर पेढा हे देशभरातील लोकांना सर्वाधिक आवडणारे गोड पदार्थ आहेत, त्यामुळे या प्रवर्गात त्यांना मानाचे स्थान आहे. पराग मिल्क फूड्स लि. ने या उत्पादनांचे मर्यादित प्रमाणात उत्पादन सुरु केले आहे, व मंचर येथील फॅक्टरी आऊटलेटमध्ये ते सध्या मिळत असून, भारतभरात विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. कंपनी येत्या काळात इतर लोकप्रिय पदार्थही सुरु करण्याच्या विचारात आहे, ज्यामुळे कंपनी ग्राहकांच्या विविध आवडी-निवडी भागवण्यासाठी आणखी वैविध्य साध्य करेल.