आंबेगाव शिरुर मतदारसंघात रस्ते विशेष दुरुस्तीसाठी रु. २५.०० कोटी मंजूर – विवेक वळसे पाटील, (मा. उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद)

321

महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आंबेगाव शिरुर मतदारसंघात रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम, २०२३-२४ अंतर्गत रु. २५ कोटी मंजूर झाले आहेत. सदर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वर्दळीचे असून स्थानिक लोप्रतिनिधींच्या मागणीनुसार मंजूरी घेण्यात आली आहे.अशी माहिती विवेक वळसे पाटील यांनी दिली.

मंजूर कामाचे तपशील पुढीलप्रमाणे,
१. रांजणगाव ते देवाची वाडी प्रजिमा १९, किमी ७०/०० ते ७२/६०० या रस्त्याची सुधारणा करणे ता.शिरूर – १०० लक्ष

२. पुणे आळंदी शेल पिंपळगाव वाफगाव पारगाव तर्फे खेड घोडेगाव रामा १२९, किमी ६०/०० ते ७०/०० मध्ये सुधारणा करणे ता. आंबेगाव (भाग – रामा ५० ते तालुका हद्द) – ५०० लक्ष

३. शिक्रापूर पिंपळे खालसा हिवरे कान्हुर कवठे फाकटे चांडोह, रामा ११७ प्रजिमा २३ किमी ४/०० ते ८/०० रस्ता विशेष दुरुस्ती करणे (भाग- व्यंकटेश साखर कारखाना ते हिवरे) – ५०० लक्ष

४. रामा १०३ शिरूर (ग्रामीण) कर्डेलवाडी ढोकसांगवी पिंपरी दुमाला गणेगाव खा. पिंपळे खा. मुखई करंदी ते प्रजिमा १९ रस्ता प्रजिमा १५५ ता.शिरुर किमी ११/०० ते १४/०० (भाग ढोकसांगवी ते रामा १२८) विशेष दुरुस्ती करणे – २०० लक्ष

५. शिक्रापूर गणेगाव (खा) मलठण टाकळी हाजी जांबुत प्रजिमा ५१ किमी ३०/५०० ते ३४/०० (भाग – टाकळी हाजी ते वडनेर)ची विषेश दुरुस्ती करणे ता.शिरूर – ४०० लक्ष

६. घोडेगाव नारोडी चिंचोली वडगाव साकोरे नांदूर कळंब चांडोली निरगुडसर लोणी सविंदणे कवठे निमगाव दुडे ते टाकळी हाजी जिल्हा हद्द निघोज कडे जाणारा रस्ता प्रजिमा १३ ता.शिरुर किमी ४९/०० ते ५३/०० (भाग – सविंदणे ते कवठे)ची विशेष दुरुस्ती करणे – ३०० लक्ष

७. प्रजिमा ४ ते निमगाव सावा ते जांबुत फाकटे टाकळी हाजी आमदाबाद ते रामा १०३ प्रजिमा ९, ता.शिरुर किमी ३८/४०० ते ४२/४०० (भाग – टाकळी हाजी ते तामखरवाडी) – २०० लक्ष

८. शिक्रापूर पिंपळे खालसा हिवरे कान्हुर कवठे फाकटे चांडोह, रामा ११७ प्रजिमा २३ किमी १४/०० ते १६/०० व किमी २३/०० ते २४/५०० ची विशेष दुरुस्ती करणे (भाग – कान्हुर मेसाई ते कवठे)* ता.शिरूर – ३०० लक्ष