महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना.दिलीप वळसे पाटील हे काल दि. 27 मार्च 2024 रोजी रात्री 11.45 वाजता घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताचे मनगटाला फ्रॅक्चर झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती अस्थिरोग तज्ञ डॉ.निरज आडकर व हृदयरोग तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी दिली.
शस्त्रक्रिया व इतर वैद्यकीय बाबींची माहिती वेळोवेळी देण्यात येईल.असे कळविण्यात आले आहे.