शिंगवे येथे आढळला जखमी बिबट्याचा बछडा.

225
Google search engine

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील डाळिंबाच्या बागेमध्ये जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्याला वनविभाग व बिबट रेस्क्यू सदस्यांनी मोठ्या शर्तीने ताब्यात घेऊन उपचारासाठी त्याला माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्र मध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील कासार मळ्यातील दत्तात्रय हरिभाऊ वाव्हळ यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये बिबट्या आढळून आला होता, सदर बिबट्या हा उठण्याचा प्रयत्न करून पुन्हा पुन्हा पडत होत असल्याचे वाव्हळ व इतरांना निदर्शनास आले. तात्काळ ही माहिती रेस्क्यू सदस्य नवीन सोनवणे, दत्तात्रय राजगुरव यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली, सदर बिबट्या हा घसरत चालण्याचा प्रयत्न करत होता,त्याला चालता येत नव्हते, उठत असताना तो पडत होता याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क साधला व तात्काळ व वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक दिव्या शिवचरण, प्रदीप आवटी, ऋषीकेष कोकणे, शरद जाधव संपत भोर, मनोज तळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बिबट्याला ताब्यात घेण्याची व्यूहरचना केली, मोठ्या शर्थीने या बिबट्याला ताब्यात घेतले त्याची पाहणी केली असता सदर बिबट्या हा अंदाजे एक वर्षाचा असून दोन बिबट्यांच्या झालेल्या वादात हा बिबट्या जबर जखमी झाला आहे, त्याच्या मानेला व इतर ठिकाणी जखमा झाल्या आहेत. या बिबट्याला वनविभागाच्या वतीने तात्काळ उपचारासाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्र येथे पाठविण्यात आले आहे अशी माहिती वनपाल प्रदीप कासारे यांनी दिली.
सदर बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Google search engine