कोल्हेना सोशल मीडिया मधून युवकांचा पाठिंबा…..

913
Google search engine

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांना मतदार संघातून युवकांचा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियातून पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. त्यांना पाठिंबाच्या फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून कमेंट्स पडताना दिसत आहेत. युवकांबरोबरच शेतकरी वर्ग देखील अमोल कोल्हे यांच्या मागे उभा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
2024 च्या लोकसभेसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद चंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सरळ सरळ लढत होणार असे सध्यातरी चित्र दिसत आहे, जरी खासदार अमोल कोल्हे हे साडेचार वर्षात मतदार संघात फिरकले नसले तरी त्यांनी संसदेत चांगले प्रश्न मांडले आहेत असे सोशल मीडियामध्ये युवक सांगत आहेत, त्याच बरोबर मतदार संघात युवकांच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष देत नाही. युवकांचे चांगले शिक्षण असून देखील त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाही त्यामुळे बेजार बेरोजगारी वाढली आहे. तालुक्यात ज्या ठिकाणी युवकांना कामे मिळाले आहेत ते युवक मात्र नेते मंडळींची मुले असल्याचे युवक सोशल मीडियावर सांगतात, जर मग त्यांनाच नोकरी आहेत, तर मग आम्ही करायची काय असाही प्रश्न युवक विचारत आहे. स्थानिक राजकारणामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार झाला असून त्यांच्याकडे पाहिला कोणत्याच नेतेमंडळींना टाईम नसल्याचे युवक सोशल मीडियावर सांगत आहेत. सुशिक्षित बेरोजगारी हा मोठा प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक मतदारांचा झाला आहे.
असे अनेक प्रश्न युवक सोशल मीडियावर मांडत आहेत हे प्रश्न मांडताना अमोल कोल्हे यांची ते बाजू धरत आहेत.
शेतकरी वर्ग देखील कांदा निर्यात बंदी, खतांच्या वाढत्या किमती त्याचबरोबर शेतमालाला योग्य बाजार भाव मिळत नसल्याने केंद्र सरकारवर नाराज असल्यामुळे शेतकऱ्यांचा पाठिंबा हा सहाजिकच केंद्र सरकारच्या विरुद्ध म्हणजेच अमोल कोल्हे यांना राहणार असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक बुजुर्ग मंडळी देखील शरद पवार यांना पाठिंबा असल्याचे सांगताना दिसत आहेत. तर काही मतदार आम्हाला संविधानाने दिलेला हक्क बजवायचा आहे, मिळालेला मतदानाचा अधिकार आम्ही बजावणार मात्र कोणाच्या सांगण्यावरून मतदान करणार नाही असे युवक म्हणत आहेत.

या सर्वांबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात मतदार म्हणून आहेत ते देखील अमोल कोल्हे यांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचे सांगत आहेत.

Google search engine