बिबट्या नंतर आता शेतकऱ्यांना चोरट्यांची भीती.

776
Google search engine

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आपली पाळीव जनावरे बिबट्यांपासून वाचविण्याची भीती असतानाच आता चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या चोरून नेण्याचा प्रकार घडू लागले आहेत, अवसरी बुद्रुक येथील शेतकरी बाळू रोकडे यांची दोन शेळ्या चोरटे पळून नेत असताना शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने व वेळीच सावध झाल्याने शेतकऱ्याच्या शेळ्या बचावल्या आहेत.
अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील अनिल बाळू रोकडे हे हडवळा वस्ती येथे राहत आहे, हा परिसर मंचर शिरूर रस्त्यालगत आहे, त्यांच्या पडवीमध्ये त्यांनी शेळ्या बांधलेल्या होत्या. रोकडे हे भराडी येथे त्यांचा मित्र रेवजी जाधव यांच्या समवेत ऑर्केस्ट्रा पाहून बाराच्या सुमारास घरी येत असताना त्यांना शेळ्या ओरडण्याचा आवाज आला त्यांनी पाहिले असता दोन्ही ईसम त्यांच्या गर्भवती असलेल्या दोन शेळ्या घेऊन जात होते. त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत सदस्य कल्याण हिंगे यांना फोनवरून संपर्क केला व आरडा ओरडा केला त्यानंतर कल्याण हिंगे यांनी गुलाब हिंगे, अजित येलभर, ऋषिकेश हिंगे, संकेत हिंगे, वायरमन संदेश हिंगे यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. चोरटे हे रस्त्यावरच असलेल्या गण्या डोंगर जवळील मुक्ताबाई मंदिर जवळ शेजारी त्यांनी ठेवलेल्या टेम्पो जवळ शेळ्या घेऊन चालले असताना या सर्वांना पाहून चोरट्यांनी शेळ्या जागेवर ठेवून धूम ठोकली. व शेतकऱ्याच्या शेळ्या चोरी होण्यापासून वाचल्या आहेत.
सदर टेम्पो मध्ये इतरही चोरीच्या शेळ्या मेंढ्या असण्याची शक्यता कल्याण हिंगे यांनी व्यक्त केली आहे.
मागील तीन महिन्यापासून अवसरी परिसरात नियमित असणारी पोलीस पेट्रोलिंग व्हॅन बंद असल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. परत पेट्रोलिंग चालू करण्याची मागणी उपसरपंच अनिल हिंगे यांनी केली आहे.

Google search engine