अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न….

526
Google search engine

मंचर : महाविद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी संधी देत असते विद्यार्थ्यांनी वेगवेगळे छंद जोपासावे. असे मत प्राचार्य डॉ.बाळ कांबळे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे, अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि. 20 एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाका. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरवळ रयत शिक्षण संस्थेचे येथील श्रीपतराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य .डॉ एन. एस. गायकवाड उपस्थित होते. या वेळी डॉ. एन. एस. बोलभट डॉ. व्हि.डी. सदाफळ (उपप्राचार्य, सीनियर विभाग) प्रा. एस. डी. पवळे (उपप्राचार्य, ज्युनिअर विभाग) डॉ. एस. पी. पानसरे (जिमखाना विभाग प्रमुख), डॉ. एस.एस. पाटिल (सांस्कृतिक विभाग प्रमुख), प्रा. टी.वाय. रणदिवे, प्रा. टी.जी. साळुंखे, श्री. अक्षय आहेर (सचिव, विद्यार्थी परिषद), कु. वैष्णवी भांबुरे (अध्यक्ष, विद्यार्थी परिषद) आदी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. व्हि.डी. सदाफळ यांनी केले. तर वार्षिक अहवालाचे वाचन कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष डॉ. एस. एन. बोलभट यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एन. एस. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी शैक्षणिक गुणवत्ता यादीतील 56 विद्यार्थी, तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 200 विद्यार्थी आणि सांस्कृतिक विभाग अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 102 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी डॉक्टरेट पदवी, पेटंट तसेच गेट सारख्या परीक्षा मध्ये यश संपादन केल्याबद्दल त्यांनाही महाविद्यालयाच्या वतीने गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन रुपनर आणि डॉ. कैलास एरंडे यांनी केले, आभार डॉ. एस.पी. पानसरे यांनी मानले.

Google search engine