मंचर : आंबेगाव तालुक्यातील
पारगाव व परिसरात बिबट्यांनी अक्षरक्षः धुमाकुळ घातला आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे, येथील लबडे मळ्यात दोन मेंढपाळांच्या पाच मेंढ्यांचा फडशा बिबट्यांनी पाडला. ही घटना शुक्रवारी (दि. १९ ) मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली .
लबडे मळ्यात भागचंद पोंदे यांच्या शेतात धनगर मथू सदू ढेकळे यांचा वाडा मुक्कामास आहे . वाड्यावर शुक्रवारी मध्यरात्री मेंढ्यावर बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला करून तीन मेंढ्यांचा फडशा पाडला. त्यावेळी मथू ढेकळे यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पलायन केले .
तेथून नजिकच रघू चांगण यांच्या शेतात केरु नाना माने यांच्या शेळ्या मेंढ्यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून दोन मेंढ्यांना जागीच ठार केले. शुक्रवारी दि.१९ सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
या परिसरात ऊसतोड झाल्याने बिबट्यांना लपण जागा राहिली नाही. वनविभागाच्या वतीने धनगर मेंढपाळांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत . लबडे मला परिसरात वनविभागाने त्वरित पिंजरा लावून त्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.