आंबेगाव तालुक्यात भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा….

392
Google search engine

जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहाने आंबेगाव तालुक्यात मंचर, घोडेगाव, लोणी येथे साजरा करण्यात आला. भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजा व दर्शन करण्यासाठी सकाळीच जैन बांधवांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती.
आज सकाळी मंचर शहरातील सुमतीनाथ भगवान जैन मंदिरामध्ये महावीर स्वामी जन्म कल्याणक कार्यक्रम संपन्न होऊन मंचर शहरात शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचे मंचर शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी स्वागत करून या मिरवणुकीत सहभागी झाले व जैन बांधवांना महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मिरवणुकीच्या अग्रभागी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विजयकुमार पुंगलिया, नरेंद्र समदडिया, गिरीश समदडिया, बाबूलाल पूनमिया, किशोर पुंगलिया, प्रदीप श्रीश्रीमाळ, सुरेश पुंगलिया, जयंतीलाल दोशी, शशिकांत पारेख, अभिजीत समदडिया, आशिष पुंगलिया,कमलेश शहा, अमोल पारेख, राजू भंडारी, डॉ. दिलीप नहाटा,नीरज समदडिया,प्रियेश गांधी, जयेश शहा, संतोष गांधी, ललित राठोड, वृषभ राठोड, चिराग शहा, उमेश शहा, राजू पारेख, भावेश पुंगलिया, रुपेश पुंगलिया, गोकुळ शहा, मयूर पारेख, योगेश पारेख, अमित पूनमिया, संदीप पारेख, प्रितेश गांधी, हर्षल श्रीश्रीमाळ, पंकज भंडारी, हितेन शहा, नितीन पूनामिया,सचिन दोशी, तेजस पारेख,हर्षल गांधी, सिद्धू पूनमिया, व जैन बांधव, भगिनी उपस्थित होते.
शोभायात्रा झाल्यानंतर मंचर जैन युवक संघातर्फे अन्नदान करण्यात आले.

Google search engine