गावडेवाडी ता. आंबेगाव येथे शेतकऱ्याला विहिरीतून पाणी काढताना बादलीवर बिबट्याने झेप घातल्याने विहिरीत बिबट्या पडला असल्याचे आढळून आले, तात्काळ विभागाने बिबट रेस्क्यू टीम च्या साह्याने बिबट्याला सुखरूप पणे बाहेर काढून जीवदान दिले.
गावडेवाडी ता. आंबेगाव येथील पिंपळमळ्यातील दत्तात्रय प्रभाकर गावडे यांच्या मालकीच्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी टाकलेल्या बादलीवर बिबट्याने झेप घेतली, अचानक झालेल्या प्रकाराने विहीर मालक भयभीत झाला, बिबट्या असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ बिबट रेस्क्यू सदस्य यांच्याशी संपर्क साधला , तात्काळ वन विभागाची टीम घटनास्थळी हजर झाली, यामध्ये वळती वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम, ऋषिकेश कोकणे, रेस्क्यू सदस्य मनोज तळेकर, मिलिंद टेमकर, सरपंच विजय गावडे वनमजूर अरुण खंडागळे यांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला सुखरूप काढण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र अनेक वेळा या पिंजऱ्यावरच बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेर बिबट्या पिंजऱ्यात घुसल्याने सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला व बिबट्या सुखरूप बाहेर आला आहे.
सदर बिबट्या हा एक ते दीड वर्षाचा नर जातीचा असून तो बिबट्या सुखरूप असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले.