खडकी येथे शेतात असणाऱ्या बिबट्याला गुंगीचे औषध देऊन वनविभागाने घेतली ताब्यात.

1039
Google search engine

खडकी ता. आंबेगाव येथील शेतकऱ्याच्या उसाच्या बाऱ्यामध्ये पाण्यात बसलेल्या बिबट्याला अखेर वनविभागाने दाट मारून बंदिस्त करून उपचारासाठी माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्र येथे पाठविला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील खडकी येथील माऊली नगर या परिसरात राहणाऱ्या नवनाथ शिवाजी वाबळे यांच्या घराजवळ सकाळी पहाटे पाठच्या सुमारास बिबट्या आढळून आला, तालुक्यात सर्वत्र बिबटे नेहमीच फिरतात त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले मात्र पुन्हा नऊच्या सुमारास तो बिबट्या वाबळे यांच्या घराजवळ फिरताना आढळला, दुपारी बाराच्या सुमारास वाबळे यांच्या घराशेजारीच असणाऱ्या त्यांच्या उसाच्या शेतात पाण्याच्या बाऱ्यामध्ये हा बिबट्या पुन्हा आढळला त्यांनी तात्काळ वनपाल शशिकांत मडके यांना संपर्क साधला. हा बिबट्या उलट्या करत असल्याचे वाबळे यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी माणिकदहो येथील बिबट निवारण केंद्र यांच्याशी संपर्क साधून सहाय्यता मागितली. माणिक डोह येथील टीम येतात वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक संपत तांदळे, वनरक्षक प्रदीप आवटी, ऋषिकेश कोकणे, रेस्क्यू सदस्य डॉ.अतुल साबळे, वनमजूर जालिंदर थोरात यांनी बिबट्याची पाहणी करून बिबट्याला गुंगीचे औषध दाट मारून देण्याचा वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊन डाट मारला सदर बिबट्या हा आजारी असल्याकारणाने तो पाण्यात पडून राहिला होता त्याला उष्मघात अथवा आजारी असल्याने उलट्या होत्या या बिबट्याला मोठ्या सीताफिने ताब्यात घेऊन उपचारासाठी माणिक डोह येथे पाठवल्याचे स्मिता राजहंस यांनी सांगितले.

Google search engine