हनुमान जयंतीच्या महाप्रसादासाठी ग्रामस्थांनी तब्बल तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, व एक हजार किलो कांद्याची चटणी केली तयार ….

315
Google search engine

अबब… हनुमान जयंतीच्या प्रसादासाठी ग्रामस्थांनी तब्बल तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, व एक हजार किलो कांद्याची चटणी केली तयार, आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील ग्रामदैवत हनुमानाचे जागृत स्थान म्हणून ओळखले आहे. हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षी थोरांदळे गावात मोठा उत्सव साजरा केला जातो .

या उत्सवाला राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक उपस्थित असतात . येथिल पुरी गुळवणीच्या महाप्रसादाची आगळी वेगळी परंपरा शेकडो वर्षांची असून आजही टिकून आहे. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी गावातील सर्व महिला, पुरुष, जेष्ठ मंडळी एकत्र येऊन पुऱ्या गुळवणीचा महाप्रसाद तयार करतात . सोमवारी (दि. २२) रोजी दुपारी पुऱ्या लाटण्याच्या कामाला महिलांनी सुरुवात केली . पुरुष मंडळी पुऱ्या तळण्याचे काम करत आहे . तर गावातील जेष्ठ मंडळी चटणीसाठी कांदा चिरण्याचे काम करतात.हे आज संध्याकाळ उशिरा पर्यंत चालू राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यंदा महाप्रसादासाठी तब्बल तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, व एक हजार किलो कांद्याची चटणी तयार करण्याचे काम चालू आहे. या महाप्रसादासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र येत असतात . तयार झालेला महाप्रसाद हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्माच्या कीर्तनानंतर उपस्थित ग्रामस्थ व पै – पाहुण्यांना खाऊ घातला जातो .

Google search engine