पारगाव येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा….

60
Google search engine

पारगाव ता.आंबेगाव येथील चिचगाई मळ्यातील भागचंद ढोबळे यांच्या उसाच्या शेतात मृत बिबट्याचा बछडा आढळून आला.
पारगाव येथील चिचगाई मळ्यात भागचंद ढोबळे यांच्या उसाच्या शेतातून उग्र वास येत असल्याने त्यांनी पाहणी केली असता त्यांना मृत अवस्थेतील बिबट्याचा बछडा आढळला त्यांनी तात्काळ ही माहिती वनविभागाला कळवली वनरक्षक साई मला गीत्ते यांनी तात्काळ भेट देऊन पहाणी केली व रेस्क्यू सदस्यांच्या साह्याने सदर बछड्याला उसाच्या शेतातून बाहेर काढले, पंचनामा केला आहे.
या संदर्भात मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या सदर बिबट्याचा बछडा हा अंदाजे तीन ते चार महिने वयाचा असून दोन बछड्यांच्या भांडणात त्याचा मृत्यू झाला असावा त्यानंतर त्या बछड्याला एका बाजूने तरस या वन्य प्राण्यांनी खाण्याचा प्रयत्न केला आहे, ही घटना आज सायंकाळी उशिरा लक्षात आल्याने त्याचे सर्व इच्छाधन होऊ शकले नाही उद्या शवविच्छेदन करून त्यावर वनविभागाच्या कार्यालया जवळ त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Google search engine