आता मंचरच्या सोसायटी मध्ये बिबट्या….

134
Google search engine

आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचा प्रादुर्भाव नेहमीच ग्रामीण भागात होत असतो, मात्र आता बिबट्याने शहरी भागात सुद्धा प्रवेश केला आहे, मंचर (ता. आंबेगाव) शहरातील मॅक्स केअर हॉस्पिटल समोर असलेल्या अमर इनक्लीव या सोसायटीत दि. २२ रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या दरम्यान बिबट्या (मांजर) शिकारीचा पाठलाग करत सोसायटीत शिरल्याची घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. या घटनेने सोसायटीत व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या सोसायटीत शिरला असताना बिबट्याचे लक्ष सोसायटीच्या खाली असलेल्या वॉचमन गेले नाही त्यामुळे वॉचमन थोडक्यात बचावला आहे.
मागील काही महिन्यापूर्वी मंचर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळ बिबट्याने अनेक नागरिकांना दर्शन दिले होते. या घटनेला पाच ते सहा महिने होऊन गेल्यानंतर शहरात बिबट्याचे नागरिकांना दर्शन झाले नव्हते, परंतु काल रात्रीच्या सुमारास बिबट्याने आता शहरातील सोसायट्यांमध्ये प्रवेश केला आहे, या घटनेमुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. काल पहाटेच्या सुमारास बिबट्याने सोसायटीमध्ये प्रवेश केला, मांजराचा पाठलाग करत आलेल्या बिबट्याच्या आवाजाने वॉचमन उठून बाजूला उभा राहिला बिबटया काही वेळ सोसायटीत फिरून पुन्हा बाहेर निघून गेला. सोसायटीच्या बाजूने असलेल्या भिंत काही ठिकाणी पडलेले असल्याने त्या मोकळ्या जागेतून बिबटया आतमध्ये आल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे. या सोसायटीत ४२ सदनिका आहे, मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. सोसायटीत बिबट्या आल्याचे कळतात सोसायटीत व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भिंत पडलेली असल्यामुळे बिबट्या आतमध्ये आल्याचे सोसायटीतील नागरिक सांगत असून संबंधित ठेकेदाराने भिंत लवकरात लवकर बांधावी अशी मागणी नागरीक करत आहे. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी सोसायटीतील नागरिकांनी केली आहे.

Google search engine