अवसरी बुद्रुक येथील श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा सोमवार दि. २९ व मंगळवार दि.३० रोजी….

Google search engine

अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव सोमवार (दि. २९) व मंगळवार (दि.३०) रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून बैलगाडा विजेत्यांना एकूण दोन लाख ५१ हजार पाचशे रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यात्रा उत्सव कमेटीच्या वतीने देण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी पाच ते सात श्रींची महापूजा, अभिषेक, मांडव डहाळे, हार तुरे, शेरनी वाटप , दुपारी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक ७१ हजार एक रुपये, व्दितीय क्रमांक ६१ हजार एक रुपये, तृतीय क्रमांक ४१ हजार एक रुपये, चतुर्थ क्रमांक ३१ हजार एक रुपये बक्षीस दिले जाणार आहे. एक नंबर फायनल साठी १५ हजार रुपये , दोन नंबर फायनल साठी नऊ हजार रुपये , तीन नंबर फायनल साठी सात हजार रुपये , घाटाचा राजा ११ हजार रुपये, शर्यतीमधील आकर्षक(बारी ) गाडा- दोन हजार पाचशे एक रुपये, २० फुटावरून कांड लाऊन प्रथम येणाऱ्या गाड्यास तीन हजार एक रुपये. रात्री दहा वाजता ३६ नखरेवाली हा आर्केस्ट्रा चा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवारी सकाळी सहा ते आठ पर्यंत संगीत भजन, सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत काळुबाई नाट्य कला मंडळ धामणे (खेड) यांच्या भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी एक ते चार वाजता कलगीतुरा दुपारी तीन ते रात्री आठ कुस्त्यांचा जंगी आखाडा व रात्री दहा वाजता शांताबाई जाधव संकरापुरकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

Google search engine