उन्हाळ्यामुळे अन्न पाण्याच्या शोधात मोरांचे थवे.

465
Google search engine

कडक उन्हाळ्याचा फटका नागरिकांबरोबरच वन्य प्राण्यांनाही बसू लागला आहे, वन्य प्राणी देखील पाणी व अन्नधान्याच्या शोधात सर्वत्र फिरत आहे, आज अनेक मोरांचा थवा कुदळवाडी (सातगाव पठार) परिसरातील घाट रस्त्यावर फिरताना करताना दिसत आहे.
आज कुदळवाडी घाट परिसरात अनेक मोरांचा थवा ऐन दुपारच्या वेळेत अन्न पाण्याच्या शोधात भटकत असताना दिसून आला आहे. मोर हा पक्षी बहुतांश वेळा सकाळच्या वेळेत अथवा सायंकाळच्या सुमारासच नजरेस पडत असतो. मात्र आज कुदळवाडी घाट परिसरात उन्हाच्या सुमारास अनेक मोर अन्न पाण्याच्या शोधात भटकत असताना दिसून आले आहेत. त्याचबरोबर अवसरी बुद्रुक परिसरात अनेक वानर अन्न पाण्याच्या शोधात जंगल वस्ती सोडून नागरी वस्ती कडे आलेले आहेत. मंचर वनपरिक्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे वन्य प्राणी आढळून येत आहेत बिबट्या, तरस, लांडगे, सांबर, हरण, भेकर, ससा,मोर,वानर, माकड, असे अनेक प्राणी आढळून येत आहेत.
वनविभागाने अनेक ठिकाणी पाणवठे निर्माण केले आहेत मात्र दररोज त्यात पाणी उपलब्ध असेल हे सांगता येत नाही. या पानवठयामध्ये साधारण दहा ते पंधरा दिवसांनी पाणी सोडले जाते. कडक उन्हाळ्यामुळे जास्त काळ पाणी टिकू शकत नाही. आंबेगाव तालुक्यात अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहे. तसेच अनेक दानशूर सामाजिक कार्यकर्ते सामाजिक भावनेतून अनेक चांगली कामे करत असतात त्यांनी जर वनविभागाचे अनेक पाणवठे दत्तक घेऊन त्यात पाणी तसेच अन्न पुरवले तर वन्यप्राणी देखील या उन्हाळ्याच्या लाहीलाही पासून दूर राहतील. तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था तसेच दानशूर नागरिक यांना उपलब्ध असणाऱ्या वन विभागाच्या पाणवठयाला पाणी पुरवठा करण्याचे काम करू इच्छिता त्यांनी मंचर वनपरिक्षेत्राशी संपर्क साधावा असे आवाहन मंचर वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांनी केले आहे.

Google search engine