दहावी च्या निकाला मध्ये यंदाही विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुकची उत्तुंग भरारी..

Google search engine

शिक्षण प्रसारक मंडळी अवसरी बुll.संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ( विज्ञान ) विद्यालय,अवसरी बुll या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला आहे अशी माहिती प्राचार्य श्री.अंकुश शिंगाडे, संस्थेचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी दिली.                          इयत्ता दहावी चा आॕनलाईन निकाल जाहीर झाला आहे. विद्यालयातून १७९ विद्यार्थी मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेला बसले होते.त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाने १००% निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.एवढी मोठी विक्रमी विद्यार्थी संख्या असूनही सर्व शिक्षकांच्या अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे आम्ही हे यश संपादन करू शकलो तसेच आंबेगाव तालुक्यात गुणवत्तेच्या दृष्टीने हा सर्वोत्कृष्ट निकाल आहे अशी भावना प्राचार्य अंकुश शिंगाडे यांनी व्यक्त केली. २००८ पासून सातत्याने सलग १६ वर्षे विद्यालयाचा दहावीचा निकाल १००% लागत आहे. केवळ संख्यात्मकच नाही तर निकालामध्ये गुणात्मक दर्जाही दिसून येत आहे. उच्चांकी १२३ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी मध्ये प्राविण्य मिळविले असून,प्रथम श्रेणी मध्ये ४४, तर द्वितीय श्रेणी मध्ये केवळ १२ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे उत्तीर्ण श्रेणी मध्ये एकही विद्यार्थी नाही. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विक्रमी ३५ विद्यार्थी हेच आजच्या निकालाचे वैशिष्ट्य आहे. विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी खालीलप्रमाणे.
विद्यार्थ्याचे नाव चव्हाण श्रावणी सदानंद. ४८१ मार्क्स ९६.८० %, हिंगे सान्वी संजय ४७९ मार्क्स ९५.८०%,
जाधव अर्णव नामदेव. ४७९ मार्क्स ९५.८०%,पवार संस्कार सुभाष. ४७७ मार्क्स ९५.४०%,शेळके सुदर्शन प्रभाकर. ४७५ मार्क्स ९५.००% , थोरात श्रावणी वसंत. ४७४ मार्क्स ९४.८०%, बिराजदार प्रथमेश राजेंद्र. ४७४ मार्क्स ९४.८०%, रोहकले अस्मिता पुरूषोत्तम. ४७४ मार्क्स ९४.८०%
या उत्तुंग यशात अध्यापन करणारे विद्यालयातील सर्व तज्ञ शिक्षक वृंद , तत्पर कार्यालयीन कर्मचारी आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे अशी माहिती पर्यवेक्षिका माधुरी शिंदे – खानदेशे यांनी दिली.
शिक्षण प्रसारक मंडळी अवसरी बुll.चे अध्यक्ष श्री.विष्णूशेठ हिंगे,कार्याध्यक्ष,सचिव, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन व विकास समिती ,शिक्षक पालक संघ,माता
पालक संघ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Google search engine