बिबट्याच्या हल्यात घोडा ठार,पिंजरा बसविण्याची मागणी…..

Google search engine

अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथे बिबट्याने मेंढपाळाच्या तळावर हल्ला करून घोड्याला ठार मारला आहे. या घटनेत मेंढपाळाचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अवसरी खुर्द येथे दोन दिवसापूर्वी बाजरी काढताना शेतमजुरांना बिबट्याची मादी व दोन बछडे आढळून आले होते, या घटनेत दोन वर्षाचा मुलगा बालमबाल बचावला होता. आज दि. एक जून रोजी अवसरी येथील शिंदे मळ्यातील बाराभिगा परिसरातील दिलीप विठ्ठल शिंदे यांच्या शेतामध्ये मेंढपाळ धुळा नामदेव गोरे हे आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन मुक्कामी असताना पहाटे साडेबाराच्या सुमारास बिबट्याने गोरे यांच्या घोड्यावर हल्ला करून ठार मारले व गळ्याजवळील भाग खाल्ला आहे.
या घटनेचा पंचनामा वनपाल मंचर संभाजी गायकवाड, वनरक्षक आर. आर. मोमीन. महादू तांबडे रेस्क्यू सदस्य सागर भोर यांनी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे,या घटनेत मेंढपाळचे सुमारे ५०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.
एकाच आठवड्यात दोन घटना घडल्याने अवसरी खुर्द आणि परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहेत या ठिकाणी तात्काळ पिंजरा बसविण्याची मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर,सरपंच कमलेश शिंदे व दिनेश खेडकर यांनी केली आहे.

Google search engine