भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन संपन्न..

 जाहिरात

दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२४-२५ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करुन जोडणीचे कामास मिल रोलर पूजन सोमवार (ता. ३) कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करुन सुरुवात करण्यात आली.

यावेळी बेंडे म्हणाले  कारखान्याच्या सन २०२४-२५ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. येत्या गळीत हंगामाकरीता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु केली असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कारखान्याचे संस्थापक – संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये १० लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट्य असून त्यादृष्टीने वेळेत गाळप पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायरबैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार लवकरच सुरु करणार आहोत. मागील हंगामाप्रमाणे येणारा गाळप हंगाम असल्याने ऊस उत्पादक, तोडणी वाहतुक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचारी यांनी हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन चेअरमन बेंडे यांनी केले.

मागील वर्षातील सभासद व ऊस उत्पादकांना सवलतीच्या दरात देण्यात येणारी साखर वाटपाचा कालावधी वाढवून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रत्येक महिन्याचे पहिल्या शनिवारी वाटप करण्यात येणार असून साखर न नेलेल्या सभासदांनी व ऊस उत्पादकांनी आपली राहिलेली साखर घेवून जावे असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

या वेळी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, पर्चेस ऑफिसर ब्रिजेश लोहोट, कामगार कल्याण अधिकारी चंद्रशेखर मगर, स्टोअर किपर अनिल बोंबले, सिनीअर इंजिनिअर सुनिल कालेकर, सिव्हील इंजिनिअर अमीर पठाण, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे आदी उपस्थित होते.

 जाहिरात