विद्या विकास मंदिर च्या प्राचार्य पदी सुरेश जारकड…

Google search engine

अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव,जि.पुणे विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान) या विद्यालयाच्या प्राचार्यपदी सुरेश काशिनाथ जारकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्या विकास मंदिर या प्रख्यात विद्यालयातील प्राचार्य अंकुश शिंगाडे हे सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर सदर नियुक्ती करण्यात आली. सुरेश जारकड यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा अवसरी बुद्रुक तर माध्यमिक शिक्षण विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक येथेच झाले आहे.पुढे उच्च शिक्षणानंतर त्याच विद्यालयात शिक्षक पदावर रुजू झाले. सेवेत रुजू झाल्यापासून आपल्या ३१ वर्षांच्या काळात त्यांनी संस्कृत विषयाचे अध्यापन केले आहे. संस्कृत विषयाबरोबरच त्यांचे मराठी,गणित या विषयावर प्रभुत्व राहिले आहे. सन २०१० पासून ते शिष्यवृत्ती परीक्षा विभागाचे प्रमुख होते.या काळात प्रतिवर्षी शिष्यवृत्ती व एन.एम.एम.एस मिळून सुमारे ६०० ते ७०० विद्यार्थी पात्रताधारक बनले आहेत.

सन २०१७ मध्ये त्यांना पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी तर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आंबेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष आणि पदवीधर समन्वय समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून सुरेश जारकड कार्यरत आहेत.

विद्यालयाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि संस्थेच्या मदतीने अधिकाधिक कार्यरत राहू,असा विश्वास जारकड यांनी व्यक्त केला.

सुरेश जारकड यांच्या नियुक्तीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळी अवसरी बुद्रुक या संस्थेचे अध्यक्ष विष्णू हिंगे,कार्याध्यक्ष गणपत हिंगे पाटील, सचिव वसंत हिंगे, विश्वस्त शांताराम हिंगे, खजिनदार दीपक हिंगे,सर्व संचालक मंडळ,सर्व सभासद,पर्यवेक्षिका एम.डी. खानदेशे,सर्व स्टाफ आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Google search engine