अवसरी बुद्रुक येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला…

Google search engine

ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्याच्या तत्परतेने बिबट्याच्या हल्ल्यातून शेळीला मिळाले जीवदान, ही घटना आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील विझुरा वस्ती येथे घडली आहे. वनरक्षक दिव्या शिवचरण यांनी तात्काळ येऊन घटनास्थळी भेट दिली.
अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील विझुरा वस्ती हा परिसर दोन्ही बाजूंनी डोंगर भाग असा आहे या परिसरात असणाऱ्या योगेश चव्हाण यांच्या गोडाऊन शेजारी असणाऱ्या शेतामध्ये जनार्दन नामदेव चव्हाण (वय ६८) हे आज सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या शेळ्या चारत होते. सुमारे 40 ते 50 फूट अंतरावरून बिबट्या पळत येऊन, झेप घेत शेळीवर हल्ला केला जनार्दन चव्हाण हे प्रथमता घाबरले घटनेचे गांभीर्य लक्षात येऊन त्यांनी तात्काळ हातातली काठी घेऊन बिबट्याला हूसकण्याचा प्रयत्न केला व मोठमोठ्यांनी ओरडून इतरांना आवाज दिला हे करत पर्यंत बिबट्याने शेळीच्या मानेवर दोन ठिकाणी दात लागले आहेत तर पोटावर नख्यांनी ओरखडे घेतले आहेत मात्र ज्येष्ठ नागरिक चव्हाण यांच्या तत्परतेमुळे आज त्यांना आपल्या शेळीचा जीव वाचवता आला आहे. ही घटना समजतात अजित चव्हाण यांनी वनरक्षक दिव्या शिवचरण यांना संपर्क साधून घटना कळवली त्या तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनेची पाहणी केली व त्या परिसरातील नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.
या परिसरात वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा व जनार्दन चव्हाण यांना जखमी शेळी साठी योग्य तो मोबदला मिळावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य कल्याण हिंगे व शिवसेना जिल्हा संघटक अजित चव्हाण, संजय दादाभाऊ चव्हाण यांनी केली आहे.

Google search engine